Breaking News

वेळ आल्यास तोंडी तलाक प्रथा बंद करण्यासाठी कायदा करू - व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली, दि. 21 - मुस्लीम समाजाने आपणहूनच तोंडी तलाकची प्रथा बंद करावी. मुस्लीम समाज तोंडी तलाकची प्रथा बदलण्यात अपयशी झाला. तर  सरकार ही प्रथा बंद करण्यासाठी कायदा करू शकते, असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज येथे सांगितले.
बाल विवाह, सती व हुंडा यांसारख्या हिंदू परंपरांसारख्या प्राचीन परंपरा बंद करण्यात आल्या आहेत. सरकार कोणाच्याही व्यक्तीगत प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा  प्रयत्न करत नाही. मात्र कायद्यासमोर महिला व समानता यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे, असेही नायडू म्हणाले. संपूर्ण समाजाने हा मुद्दा उचलून धरला  पाहिजे. जर मुस्लीम समाजाने स्वत:हून प्रथा बदलली तर ते अधिक चांगले होईल. अन्यथा सरकारला वेगळे विधेयक आणून कायदा संमत करावा लागेल. हा निर्णय  केवळ तोंडी तलाकपुरता मर्यादित नाही. तर समाजातील कोणत्याही चांगल्या मुद्याशी संबंधित आहे, असेही नायडू म्हणाले.