Breaking News

स्व.अ‍ॅड.बाबुरावजी डोंगरे जन्मशताब्दी महोत्सव समितीतर्फे अभिवादन सोहळ्याचे आयोजन

बुलडाणा, दि. 21 - शिक्षण प्रसारक मंडळ बुलढाण्याचे संस्थापक तथा भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय कार्यकर्ते स्व. अ‍ॅड. माधव गजानन उर्फ बाबुरावजी डोंगरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 23 मे 2017 ते 23 मे 2018 या कालावधी मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे महोत्सव समितीने ठरविले आहे. जन्मशताब्दी महोत्सवाची सुरूवात 23 मे 2017 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रबोधन विद्यालय जिजामाता नगर बुलढाणा येथे अभिवादन सोहळयाने होणार आहे.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर स्व. बाबुरावजींच्या जीवनातील आठवणी कथन करणार आहे. तसेच महोत्सव समितीच्या वतीने पुढील वर्षभरातील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असलेले स्व. बाबुरावजी डोंगरे म्हणजे एक समर्पित व्यक्तीमत्व. जे आयुष्यभर इदं न मम या तत्वानुसार जीवन जगले आणि त्यांचे संपर्कात आलेल्या अनेकांना त्यांनी आधार देवून जीवन जगण्यास सक्षम केले.स्व. बाबुरावजींनी समाजाच्या विविध क्षेत्रात सहकार, कामगार, शिक्षण, न्यायव्यवस्था या क्षेत्रात अविस्मरणीय कार्य केलेले आहे. या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याची नव्या पिढीला ओळख व्हावी आणि कार्य करण्याची प्रेरणा मिळावी या भावनेतून जन्मशताब्दी महोत्सव समिती वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.