Breaking News

175 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

नांदेड, दि. 24 - राज्यभरातील 175 सहायक पोलीस निरीक्षकांना बदल्या मिळाल्या आहेत.तसेच 505 जणांच्या बदली अर्जाना नकार देण्यात आला आहे.  नांदेड जिल्ह्यातील 5 सहायक पोलीस निरीक्षकांना बदल्या देण्यात आल्या आहेत.तसेच नांदेड पोलीस परिक्षेत्रात 5 सहायक पोलीस निरीक्षकांना नियुक्ती देण्यात आली  आहे.नांदेड जिल्ह्यातील 4 सहायक पोलीस निरीक्षकांना बदल्यांसाठी नकार देण्यात आला आहे.असे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाचे  विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांनी काल दिनांक 21 मे 2017 रोजी जारी केले आहेत.या सोबतच जनहितार्थ या नावाखाली 252 सहायक पोलीस  निरीक्षकांना बदल्या देण्यात आल्या आहेत.
राज्यभरातील सहायक पोलीस निरीक्षकांना सर्वसाधारण बदल्यांच्या प्रक्रियेत ज्या सहायक पोलीस निरीक्षकांनी आपला विहित कालावधी पूर्ण केला आहे.त्यातील 175  जणांना बदल्या देण्यात आल्या आहेत.त्यात नांदेड जिल्ह्यातील रवींद्रसिंघ राखासिंघ धुन्ने यांना कोकण परिक्षेत्रात पाठवण्यात आले आहे.पंडित सोपानराव कच्छवे  यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागात नियुक्ती देण्यात आली आहे.बालक पांडुरंग कोळी,संजय पुंजाजीराव गायकवाड आणि संजय भुजंगराव चौबे या तिघांना  अमरावती पोलीस परिक्षेत्रात नियुक्ती देण्यात आली आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्रात 5 सहायक पोलीस निरीक्षक येणार आहेत.त्यात साहेबराव लक्ष्मण गुट्टे हे राज्य गुन्हे  अन्वेषण विभागातून येत आहेत.नितीन भास्करराव काशीकर आणि शेख चांद खादरसाब हे गुन्हे अन्वेषण विभागातून येणार आहेत.अकोला येथील विष्णुकांत तुकाराम  गुट्टे आणि बीड येथील बळवंत अण्णा जमादार हे नांदेड पोलीस परिक्षेत्रात येणार आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयाच्या आस्थापना मंडळाने अश्या 175 सहायक  पोलीस निरीक्षकांना राज्यभरात नवीन ठिकाणी नियुक्त्या दिल्या आहेत.सोबतच 505 सहायक पोलीस निरीक्षकांनी बदल्यांसाठी केलेले विनंती अर्ज नाकारण्यात आले  आहेत.त्यात नांदेड जिल्ह्याचे शेख अहमद शेख लाल,शिवाजी सुभाषराव पवार,दिनेश दिगंबर सोनसकर आणि अभय भास्करराव दंडगव्हाण या 4 अधिकार्यांचा समावेश  आहे.
जनहितार्थ या सदराखाली एकूण 252 सहायक पोलीस निरीक्षकांना बदल्या देण्यात आल्या आहेत त्यात नांदेडचे 8 बदलून जाणार आहेत तर नांदेड पोलीस  परिक्षेत्रात 12 येणार आहेत.या बदल्यांमध्ये नांदेड येथून दुसरीकडे जाणारे सहायक पोलीस निरीक्षक असे आहेत.अमोल दिनकर धस (औरंगाबाद परिक्षेत्र) दत्तात्रय  वामनराव शिंदे (पुणे शहर) अमोल वामनराव सातोदकर (औरंगाबाद शहर) शेख रहेमान शेख रसूल (दुसर्यांदा महामार्ग सुरक्षा पथक) सतीश दत्ताराम महल्ले (नागपूर  शहर) विशाल पुंडलिकराव नांदे (अमरावती परिक्षेत्र) आनंद केशवराव झोटे (अमरावती परिक्षेत्र) शंकर श्रीराम वाघमोडे (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग) या  जनहितार्थ बदल्यांमध्ये नांदेड पोलीस परिक्षेत्रात येणारे सहायक पोलीस निरीक्षक असे आहेत. उत्तम गोविंदराव चक्रे (रागूवि) राजकुमार रामण कज्जेवाड (रागूवि)  संतोष वैजनाथ केंद्रे (यवतमाळ) गणेश माणिकराव सोंडारे (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग) विश्‍वनाथ दिगंबर नाईकवाडे (बुलढाणा) जयसिंह कवरसिंह ठाकूर (बीड)  बाबासाहेब हरिश्‍चंद्र काकडे (रत्नागिरी) महमंद युसूफ महमंद मुसा (अहमदनगर) फिरोजखान पठाण (अमरावती) व्यंकटेश सुग्रीव आलेवार (ठाणे शहर) किशोर  बाबुराव बोधगिरे (ठाणे शहर) रेखा श्यामराव शहारे (मुंबई शहर).