Breaking News

शिवाजी महाराजांचा अवमान करणार्या तिडकेला 14 दिवसांची कोठडी

बीड, दि. 24 - छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजामाता यांचा अवमान करणार्या आरोपीला अंबाजोगाई येथील दिवाणी न्यायालयाने 14  दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्याबद्दलअपशब्द वापरल्याने तिडके याच्या विरोधात राज्यात संतापाची  लाट उसळली होती. या संदर्भात बीड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अगदी खेड्या गावांपासून नागरिकांनी  कडकडित बंद पाळून या अवमानकारक गोष्टीचा निषेध केला होता. या संदर्भात पोलिसांनी तिडके यास अटक केली आहे. विठ्ठल तिडकेला अंबाजोगाई येथील दिवाणी  न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश यु. व्ही. जोशी यांनी त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.