Breaking News

बुलडाणा तालुक्यातील तीन गावांसाठी पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा, दि. 27 - पाणी टंचाई आराखड्यामध्ये समाविष्ट जिल्ह्यातील 3 गावांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील पाडळी, दत्तपूर व ढासाळवाडी गावाचा समावेश आहे. पाडळी गावची लोकसंख्या 3840 असून गावाकरिता 24 मेट्रीक टन क्षमतेचे 1 टँकर दिवसातून 3 फेर्‍या मारणार आहे. दत्तपूरच्या 810 लोकसंख्येसाठी 24 मेट्रीक टन क्षमतेचे 1 टँकर दिवसातून 2 फेरी मारणार आहे. गटविकास अधिकारी यांनी संबंधित गावांना वेळोवेळी भेटी देवून टँकरच्या खेपांची नोंद तपासावी. ग्रामपंचायतीने नोंद व्यवस्थित घ्यावी. टँकरचे पाणी शुद्ध करूनच पुरविल्या जात असल्याबाबत दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाणी टंचाई निवारण कक्षाने कळविले आहे.