Breaking News

सुलतानपूर येथे एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे आकार प्रशिक्षण संपन्न

बुलडाणा, दि. 27 - तालुक्यातील सुलतानपूर येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प लोणार मधील सुलतानपूर गटातील अंगणवाडी सेविकांचे आकार प्रशिक्षण आज 25 एप्रिल रोजी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती अश्‍विनी सोने व पर्यवेक्षिका भिकाबाई सानप यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यामध्ये सुलतानपूर गटातील अंजनी खुर्द, सुलतानपूर, कारेगाव, वडगाव तेजन, पारडी सिरसाट, वाल्हूर येथील अंगणवाडी सेविकांनी उपस्थित राहून आकार प्रशिक्षण पूर्ण केले. यामध्ये अंगणवाडी सेविकांना अंगणवाडीतील लहान लहान मुलामुलींचा शारीरिक विकास, चेतना व्यायाम, बोध्दिक विकास, अनोपचारिक गप्पा, भाषा विकास, सामाजिक भावनिक विकास, सृजनशीलता व सौंदर्य  दृष्टीचा विकास, अशा विविध प्रकारचे सहा दिवसाचे आकार प्रशिक्षण अंगणवाडी पर्यवेक्षिकेने दिले. यावेळी अंगणवाडी सेविका श्रीमती शोभा भोकरे, छाया गायकवाड, कुसुम मिसाळ, रेणुका दळवी, दुर्गा भानापुरे, सुषमा सोमण, रुखामिना पनाड, सत्यशीला टकले, सुरेखा वाघमारे, आशा टकले, अंजली परिहार, पुष्पा मोरे, रेखा जाधव, लक्ष्मी म्हस्के, लता गुंगे, रेणुका लादे, कमल चेके, कुसुम सवडदकर, सागर मगर, शांताबाई गीते, राधा सिरसाठ, शारदा जाधव यांना एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती अश्‍विनी सोने यांच्या हस्ते आकार प्रशिक्षनाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.