Breaking News

मुंबई पोलिसांना विमान हायजॅकबाबत ईमेल, सुरक्षेत वाढ

मुंबई, दि. 16 - मुंबई पोलिसांना विमान हायजॅकबाबत ईमेल आला आहे. त्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांमधील पोलिस उपायुक्तांना अज्ञात महिलेकडून ईमेल आला. या ईमेलनुसार, महिलेने विमानतळावर तीन व्यक्तींमधील संवाद ऐकला. ते तिघेजण मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद येथून विमान हायजॅक करण्याबाबत बोलत होते, असं महिलेने ईमेलमध्ये सांगितले आहे. अज्ञात महिलेच्या ईमेलनतर मुंबई पोलिसांनी विमानतळ आणि परिसरातील सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. शिवाय, कसून तपास सुरु केला आहे.