Breaking News

विकास कामांसाठी कटिबध्द - सभापती झावरे

अहमदनगर, दि. 03 - गावातील पदाधिकार्‍यांनी पाठपुरावा केल्यास पारनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये पंचायत समिती मार्फत विविध विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पारनेर पंचायत समितीचे सभापती राहूल नंदकुमार झावरे यांनी दिली.
अळकुटी, ता. पारनेर येथे ग्रामस्थांच्यावतीने सरपंच बाबाजी भंडारी यांच्या शुभहस्ते सभापती राहुल झावरे यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे, तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव घोलप, चेअरमन बाळासाहेब पुंडे, उपसरपंच मधुकर जाधव, व्हा. चेअरमन शिवाजी शिरोळे, करंदीचे चेअरमन नामदेव ठाणगे, ग्रामपंचायत सदस्य महेश शिरोळे, अरिफ पटेल, शरद घोलप, सुभाष पुंडे, प्रतिभा बुळे, माजी सरपंच सखाराम उजघरे, माजी चेअरमन महादु भंडारी, पोपटराव भोसले, शशिकांत कनिंगध्वज, नुर कुरेशी, अन्वर मोमीन, अनिल चौधरी, पाबळ माजी सरपंच शिवाजी कवडे, बाळासाहेब कवडे, पाडळीआळे माजी सरपंच बाळासाहेब गुजर, बाळासाहेब भंडारी, संपत परंडवाल, जब्बार आत्तार, बाळू कनिंगध्वज, सागर शिंदे, शशिकांत पुंडे, रावसाहेब भंडारी, दत्ता रोकडे, गणेश जाधव, विठ्ठल भंडारी, इरफान कुरेशी, निसार आत्तार, नितीन परंडवाल आदि उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. भास्कर शिरोळे व बाबाजी भंडारी यांनी अळकुटी व परिसरातील विविध विकास कामांची मागणी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश शिरोळे व आभार प्रदर्शन मधुकर जाधव यांनी केले.