पालकमंत्री ना.राम शिंदे यांच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागणार
। नवनिर्वाचित सभापती सुभाष आव्हाड यांचा सत्कार
अहमदनगर, दि. 03 - दि 30 मार्च रोजी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक शाखा जामखेड , शिक्षक संघ व् गुरुमाउली मंडळ यांच्या वतीने जामखेड तालुक्यातील नवनिर्वाचित सभापती सुभाष आव्हाड सर उपसभापति सौ राजश्री सुर्यकांत मोरे व् सौ मनीषा रविन्द्र सुरवसे माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर जि प सदस्य सोमनाथ पाचारने आदींचा सत्कार शिक्षक बँकेत आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक बँकेचे चेअरमन रावसाहेब रोहोकले हे होते कार्यक्रमास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे भाजपा तालुकाध्यक्ष रविन्द्र सुरवसे काशीनाथ ओमासे अनिल लोखंडे विकास मंडळ अध्यक्ष संजय शिंदे विश्वस्त राजाभाऊ पालवे आदि उपस्थित होतेयावेळी सभापती सुभाष आव्हाड म्हणाले मी स्वत् शिक्षक असून नवीन प स सदस्यामधे दोन प्राथमिक शिक्षकांच्या स्नुषा आहेत त्यामुळे आम्हाला शिक्षकांचे प्रश्न माहीत आहेत शिक्षक सध्या विविध प्रकारे अडचणीत असून बदल्यांच्या धोरणामुळे त्रस्त आहे ना प्रा राम शिंदे साहेब यांचेमार्फत शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु व् स्थानिक पातळीवरील शिक्षकांचे प्रश्न संघटनेच्या पदाधिकार्याना विश्वासात घेऊन सोडवू असे आस्वासन सभापतींनी दिले
यावेळी उपसभापति सौ राजश्री मोरे यांनीही सर्वाना शुभेच्छा देऊन शिक्षक बँकेस स्वमालकिचि जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले
अध्यक्षीय भाषणात चेअरमन रावसाहेब रोहोकले यांनी बँकेच्या विविध योजनाची माहिती दिली शिक्षक बँकेत गुरुमाउली मंडळाची सत्ता स्थापन झाल्यापासून एकहि दिवस कर्जवाटप बंद नाही कमितकमी व्याजदरात जास्तीत जास्त कर्ज देण्याचा शिक्षक बँक प्रयत्न करते नवनिर्वाचित सर्व पदाधिकार्याना पुढील कामासाठी शिक्षक बँकेच्या वतीने शुभेच्छा दिल्या
यावेळी सुर्यकांत नाना मोरे रविन्द्र सुरवसे नीलकंठ घायतड़क आदिनी मनोगते व्यक्त केली शिक्षकनेते राम निकम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर संचालक सौ सीमा निकम यानी बँकेच्या कामकाजाची माहिती दिली यावेळी पत्रकारितेतील आ बबन शिंदे राज्यस्तरिय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल दै सकाळचे पत्रकार वसंत सानप व् आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीम जयश्री मुकने व् सुशेन चेंटमपल्ली यांचाहि बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोष राउत गुरुमाउली मंडळाचे अध्यक्ष नारायण लहाने महिला आघाडी अध्यक्ष आशा सोळसे दिगाम्बर पवार राजेन्द्र मोहोळकर सुभाष फसले शहाजी जगताप दत्तात्रय आंधळकर माजिद शेख हनुमंत निंबाळकर ,श्रीहरि साबळे उत्तम पवार सुरेश सरगर, सचिन पवार नागनाथ कोणकेवाड गणेश नेटके गोकुळ गायकवाड़ नितिन पवार जालिंदर यादव आदिनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले तर आभार राजेन्द्र हजारे यांनी मानले.
