Breaking News

महाराष्ट्र दिनी कोल्हापुरात राज्यातला सर्वात उंच तिरंगा फडकणार

कोल्हापूर, दि. 22 - आकाशाला भिडणारा डौलानं फडकणारा कोल्हापूरचा अभिमानबिंदू महाराष्ट्रातला सर्वात उंच ध्वजस्तंभ. यंदाच्या महाराष्ट्र दिनी कोल्हापूरमध्ये फडकणारा तिरंगा हा राज्यातला सर्वात उंचावर फडकणारा तिरंगा ठरणार आहे.
कोल्हापूर शहर सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या अंतर्गत सर्वात उंच ध्वजस्तंभाचे काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. कोल्हापूर पोलिस मुख्यालयासमोरच्या उद्यानात हा ध्वजस्तंभ उभारला जात असून शहरातल्या कोणत्याही कोपर्‍यातून या ध्वजाचे दर्शन होणार आहे. याशिवाय ध्वजनिर्मितीची कहाणी, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि 22 फुटांचा कारंजाही इथं असेल. त्यामुळे 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी महाराष्ट्रातला सर्वात उंच ध्वज आकाशात डौलेल तेव्हा अवघ्या भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल.