तूर खरेदीवर राज्य सरकार तोंडघशी, लाखो क्विंटल तूर खरेदी विना
मुंबई, दि. 22 - शेवटच्या दाण्यापर्यंत तुरीची खरेदी सुरूच राहील, अशी वल्गना करणारं राज्य सरकार सपशेल तोंडघशी पडलेलं दिसतं आहे. कारण नाफेडकडून होणार्या तूर खरेदीचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र लाखो क्विंटल वजनाच्या तुरीची अद्यापही खरेदी झालेली नाही. त्यामुळं 4 दिवसांपासून तूर विक्रीसाठी बाजारात मुक्काम ठोकून बसलेल्या शेतकर्यांसमोर मोठं संकट उभ ठाकलं आहे.
वाशिम जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी नाफेड्ची तूर खरेदी अद्यापही सुरु नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच लग्नसराईचे दिवस असल्याने लग्नकार्य तसेच आगामी खरीप हंगामासाठी बी बियाणे, खते याची जुळवाजुळव कशी करावी या आर्थिक विंवचनेत सापडला आहे.
तर यवतमाळ जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तूर खरेदी सुरू आहे. मात्र यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक शेतकरी तूर खरेदी होईल, या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून शेतकरी पायपीट मात्र थांबली नसल्याचेही दिसून येत आहे.