Breaking News

पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

बुलडाणा, दि. 28 - बंधार्‍यातपोहण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज 26 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजताचे सुमारास खामगाव तालुक्यामधील आंबेटाकळी शिवारात घडली.पिकांसाठी शिर्ला येथील मन प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी सोडण्यात आलेले असल्याने परिसरात बंधारे आहेत. आंबेटाकळी येथील गणेश डिगांबर लांजुडकर हा आज त्याच्या मित्रासोबत पोहण्यासाठी गाव शिवारातील बंधार्‍यात गेला होता. पोहताना तो अचानक खोल पाण्यात गेल्याने बुडाला यातच त्याचा करुण अंत झाला.    गणेश लांजुडकर याने नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा दिली आहे. त्याच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.