Breaking News

जिल्ह्यात मेरा बु, असोला बु व गोरेगाव गावांसाठी पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा, दि. 28 - पाणी टंचाई आराखड्यामध्ये समाविष्ट जिल्ह्यातील 3 गावांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये चिखली तालुक्यातील मेरा बु, असोला बु व सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगांव गावाचा समावेश आहे. मेरा बु येथील लोकसंख्या 1100 असून गावाकरिता 24 मेट्रीक टन क्षमतेचे 1 टँकर दिवसातून 3 फेर्‍या मारणार आहे. असोला बु च्या 2400 लोकसंख्येसाठी 24 मेट्रीक टन क्षमतेचे 1 टँकर दिवसातून 3 फेरी मारणार आहे. तर गोरेगांव 1945 लोकसंख्येकरीता याच क्षमतेचे एक टँकर दिवसातून 3 फेर्‍या मारणार आहे.
गटविकास अधिकारी यांनी संबंधित गावांना वेळोवेळी भेटी देवून टँकरच्या खेपांची नोंद तपासावी. ग्रामपंचायतीने नोंद व्यवस्थित घ्यावी. टँकरचे पाणी शुद्ध करूनच पुरविल्या जात असल्याबाबत दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाणी टंचाई निवारण कक्षाने कळविले आहे.