Breaking News

दगडवाडी गावाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक ऐकता पुरस्कार

बुलडाणा, दि. 28 - संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये दगडवाडी (रघुविर वाडी) या गावाने भाग घेतला होता त्यानुसार हे गाव तालुक्यातुन प्रथम तर जिल्हास्तरावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकतेचा पुरस्कार नुकताच जिल्हा परिषदेने जाहिर केला आहे. 
दगडवाडी या गावात सन उत्सव महामानवाच्या जयंत्या सर्व जाती धार्मात एकोप्याने विना पोलीस बंदोबस्तात होतात गावात कुठलाही जातीय तेढ नसुन एक गाव एक पाणवठा एक गाव एक म्हशान भुमी, एक गांव एक गणपती तसेच मागासवर्गीय वस्ती गावाच्या एका बाजुला नसुन संपुर्ण गावात समाविष्ट आहे. हे या गावाचे विशेष म्हनुनच या गावाला सामाजिक एकतेचा जिल्हाचा पुरस्कार मिळाला आहे. आतापर्यंत या गावाने सरपंच सौ.चंद्रकला गजानन घुगे यांच्या नेतृत्वात व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे तंटामुक्ती पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार, जलभुमी अभियान पुरस्कार, दलीत वस्ती सुधार योजना जिल्हास्तर पुरस्कार, कुटुंब कल्यान पुरस्कार, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता जिल्हास्तरावर पुरस्कार, असे विविध पुरस्कार मिळविले आहे. या सर्वांचे श्रेय गावकरी शिक्षकवृंद बचत गट ग्रामसेविका यांना जाते असे सरपंच सौ.घुगे यांनी सांगीतले.