Breaking News

मंगलगेट परिसरात लवकरच तालिम उभारणार - आ.जगताप

अहमदनगर, दि. 28 - नागरिकांसमोर फक्त अश्‍वासन देणार नाही, तर युवकांनी व तरुण पिडीने चुकीच्या मार्गाला किंवा व्यसनाला जावु नये म्हणुन मंगलगेट परिसरात लवकरच सर्वांसाठीच तालिम उभारणार असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले. 
मंगलगेट येथील नागरिकांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात जिल्हा तालिम संघ आयोजित चषक कुस्ती स्पर्धेत मानाची गदा मिळवणारा नगरचा व परिसरातील नागरिकांचा लाडका आकाश भिंगारे यांचा सत्कार नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष कुमार वाकळे, म.न.पा. गट नेते संपत बारस्कर, डबल महाराष्ट्र चॅम्पीयन डबल सुवर्णपदक विजेता पै.केवल अन्ना भिंगारे, उत्तर महाराष्ट्र केसरी पै.पवन भिंगारे, साईकेसरी पै.अतुल कावळे, सुनिल भिंगारे, अनिल भिंगारे, अंकुश भिंगारे, विनोद बोराटे, सतिष चौधरी, संजय झिंजे, पै.सनी विधाते, पी.आर.पी.चे जिल्हाध्यक्ष सुनिल क्षेत्रे, नितीन कसबेकर, विजय वडागळे, महेश भोेसले उपस्थित होते तसेच मंगलगेट परिसरातील सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे मिलिंद तरुण मंडळ व नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जगताप पुध्े म्हणाले महाराष्ट्राची लाल माती हे एक वेगळे नाव लौकिक आहे. कुस्ती क्षेत्राचा ईतिहास आहे, आणि फार मोठा वारसा हा भिंगारे परिवाराला देखील आहे. या क्षेत्रात त्यांचे वडिल देखील एक चांगले मल्ल होते. त्यांनीही जिल्ह्यात चांगले नाव कमविले. त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत पवन भिंगारे यांनी जिल्ह्यात व महाराष्ट्रात नाव कमविले त्यांच्याही पाऊलावर पाऊल टाकत आकाश भिंगारे पुध्े आले आहेत. या अनुषंगाने आम्ही देखील प्रयत्न करतो. हा तरुण वर्ग निर्वेसनी राहिला पाहिजे. निर्वेसनी राहुन हा  समाजामध्ये चांगल्या प्रकारची दिशा मिळाली पाहिजे. त्याकरिता आपण सर्वांचा महत्वाचे पाऊल म्हणजे त्याला आपण कुठेतरी शरीर दृष्टीच्या अनुषंगाच्या आपण त्याला चांगल्या क्षेत्रामध्ये म्हणजे व्यायामाकडे आवड निर्माण केली पाहिजे.