जिल्हा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने चौधरी सन्मानित
अकोले, दि. 28 - अकोले तालुक्यातील आढळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक व ज्येष्ठ क्रीडा शिक्षक शिवाजी चौधरी यांना मंगळवारी (दि. 25) महाराष्ट्र राज्य व नगर जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने ‘जिल्हा आदर्श क्रीडा शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राहुरी कृषी विद्यापीठ येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उत्तरनगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे हे होते. याप्रसंगी राहुरी येथील साई आदर्श मल्टिस्टेट को. ऑ. सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी कपाळे, चैतन्य मिल्क अॅड ऍग्रोचे अध्यक्ष गणेश भांड, शिक्षक नेते अप्पा शिंदे, सुनिल जाधव, राजेंद्र लांडे, क्रीडा अधिकारी खुरांगे, देवकाते, सुनिल पंडित, बाबासाहेब बोडके, राजेंद्र कोतकर हे मान्यवर उपस्थित होते.
शिवाजी चौधरी सुगाव येथील महात्मा फुले विद्यालयात 29 वर्ष क्रीडा शिक्षक शिक्षक म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांना देवठाण येथील अढळा विद्यालयात पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. 1989 साली दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या मार्गदर्शनाखालील भरतीयम लेझीमची निवड झाली होती.त्यांचे शालेय मुला - मुलींचे संघ दरवर्षी तालुका, जिल्हा, विभाग पातळीपर्यंत जातात. त्याच्या पाच विद्यार्थ्यांची मैदानी स्पर्धेत राज्यपातळीवर निवड झाली आहे तसेच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यातही त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.
या पुरस्काराबद्दल अगस्ती शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी दुर्गाबाई नाईकवाडी, कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतिश नाईकवाडीर, माजी प्राचार्य संपत नाईकवाडी, अकोले तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष पत्रकार प्रकाश आरोटे, सर्व विद्यालयांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, सुगाव, देवठाण, माळीझाप, नवलेवाडी, अकोले ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.