आठवडी बाजाराच्या नियोजनासाठी उपाय सुचविण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 24 - येथील रविवारच्या साप्ताहिक बाजाराचा विस्तार वाढला असल्यामुळे ग्राहक, विक्रेते यांची गर्दी, पार्किग तसेच जागेची कमतरता अशा समस्या उद्भवत आहेत. या समस्यांचे निराकरण होवून आठवडी बाजाराला शिस्तबध्द आणि सुनियोजित करण्याच्या दृष्टीकोनातून शहरातील नागरीकांनी उपाय सुचवावे, असे आवाहन मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
या पत्रकात नमुद केले आहे की, जिल्हा मुख्यालयातील आठवडी बाजार मुख्य बाजार लाईन आणि सिनेमा टॉकीजपर्यंत पुर्वी भरायचा. मात्र शहराची लोकसंख्या जसजशी वाढत आहे, तसे बाजारानेही आपली व्याप्ती वाढविली. आसपासच्या 25 पेक्षा अधिक खेड्यांमधील शेतकरी, व्यापारी, लघुव्यवसायीक शहरात दाखल होवून आठवडी बाजारात माल विक्री करतात. येथील कापड मार्केटही प्रसिध्द आहे. मात्र बाजार नियंत्रणा बाहेर जात असून वाहतुकीला अडथळा आणि अपघाताची भिती अशा ठळक बाबींसह अस्ताव्यस्तपणामुळे बाजाराचे सुनियोजन करणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे नागरीकांमधूनही काही चांगले उपाय महत्वाचे ठरू शकतात. यामुळे आठवडी बाजाराच्या सुनियोजनाला घेवून ज्यांनाही नगर पालिकेला उपाय सुचवायचे असतील त्यांनी 30 एप्रिल पर्यंत मुख्याधिकारी यांच्याकडे कागदावर लिखीत स्वरूपात स्वत:चे नाव, पत्त्सासह पाठवावे असे आवाहन मुख्याधिकारी चव्हाण यांनी केले आहे.