पिंप्राळा येथे गोठ्याला आग
बुलडाणा, दि. 24 - तालुक्यातील पिंप्राळा येथे लागलेल्या आगीत सात ते आठ गोठे जळून खाक झाले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. 22 एप्रिलच्या दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. कुटाराला आग लागल्याने परिसरातील गोठे आगीच्या विळख्यात सापडले. गणोश श्रीराम हिंगणो, आनंद बाबन चंडाळणो, देवमन उत्तम वाकोडे, महादेव लक्ष्मण काळणो, माणिकराव जगन्नाथ पेसोडे, पांडु भगवान वाकोडे, नवृत्ती भगवान वाकोडे यांच्यासह अन्य शेतकर्यांच्या गोठयातील जणावरांचा चारा, कडबा, सोयाबीनचे कुटार, तुरीचे कुटार, जळून खाक झाले. तसेच गणोश हिंगणो यांचे मळणी यंत्र तसेच ट्रॅक्टरची चाकेही जळाली. आग विझविण्याकरिता नागरिकांनी धावपळ केली. दरम्यान, खामगाव, शेगाव व बाळूपर, बुलडाणा येथून पोहोचलेल्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. घटनेची माहिती समजल्यानंतर पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर व आ. आकाश फुंडकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.