जीव वाचवूनही दगड झेलतात आपले जवान : पंतप्रधान
नवी दिल्ली, दि. 21 - काश्मीरमध्ये येणारा पूर असो वा देशावर होणारे हल्ले परतवून लावत देंचे जीव वाचवणारे जवान काश्मीर खोर्यात नागरिकांनी फेकलेले दगडही झेलतात, असे भावोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे काढले. नागरी सेवा दिनानिमित्ताने प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांना संबोधित करताना ते बोलत होते. या कार्यक्रमात प्रशासनात उत्तम कामगिरी बजावणार्या अधिकार्यांचा गौरव करण्यात आला.
जवानांनी पूरपरिस्थितून आपले संरक्षण केल्याबाबत त्यांना आदर दिला जातो. त्यांचे कौतुक केले जाते. मात्र दुसरीकडे त्यांच्यावरच दगडफेक केली जाते. यावर आत्मचिंतन करण्याची आवश्यकता पंतप्रधान मोदी यांनी प्रतिपादित केली. बदलत्या काळानुसार आपल्याला आपल्या कार्यपद्धतीतदेखील बदल करायला हवा. गेल्या 15 वर्षांमध्ये काम करण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. आता आपली जबाबदारी वाढली आहे. लोकांकडे आता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आता आपल्यासमोरील आव्हानेही वाढली आहेत, असे ते म्हणाले. ई-गव्हर्नन्स, एम-गव्हर्नन्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे झाले आहे. यामुळे सोयी-सुविधांचे लाभ लोकांपर्यंत सुलभतेने पोहोचवता येतात. राजकीय नेतृत्त्वात बदल झाल्यावर धोरणांमध्ये बदल होतात. हे बदल आणि सरकारने घेतलेल्या निर्णयाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रशासकीय अधिकार्यांचे आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकार्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा देशहिताचाच असायला हवा, असे त्यांनी नमूद केले.