देशातील प्रत्येक राज्यात राजकीय प्रशिक्षण देणारी संस्था स्थापन करावी
पुणे, दि. 21 - देशाती राजकारणाला नवी दिशा देण्यासाठी संपुर्ण भारतात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्नीकल लीडरशिप अॅण्ड गव्हर्नन्स (आयआयपीएलजी) सुरू कराव्यात. अशा संस्था संबंधीत राज्याच्या विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, भारत सरकार आणि खाजगी शिक्षण संस्थांच्या एकत्रीत सहभागाने चालवल्या गेल्या पाहिजे. याकरीता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटने पत्र पाठवून आवाहन केले आहे, अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समुहाचे उपाध्यक्ष प्रा.राहूल कराड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे अजिक अभ्यंकर, क्रीडा पत्रकार सुनंदन लेले, पंडीत वसंतराव गाडगीळ, नगरसेवक सिध्दार्थ शिरोळे, पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टीव्हलच्या मंजिरी प्रभु, अॅड.असिम सरोदे आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, भारतातील राजकीय नेतृत्व आणि प्रशासनाचे शिक्षण देणारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्नीकल लीडरशिप अॅण्ड गव्हर्नन्स ही संस्था गुणवत्तेच्या दृष्टीने आयआयटी आणि आयआयएम यांच्या धर्तीवर असावी असा प्रस्ताव आहे.देशातील प्रत्येक राज्यात राष्ट्रीय दृष्टया महत्वाची म्हणून या संस्थेची स्थापना करावी.
कराड पुढे म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे रुपांतर महान लोकशाहीमध्ये करण्यासाठी देशात प्रक्रिया चालू आहे.मात्र अशा वेळी राजकारण आणि राजकिय नेते यांच्याबद्दल शिक्षीत तरुणांमध्ये औदासिन्य आणि भ्रमनिरास कुप मोठ्या प्रमाणात आहे.आजकाल सुशिक्षीत तरूण हा राजकिय प्रक्रियेपासून विन्मुख आहे. तरुणांनी राजकीय वृत्ती विकसीत करण्यासाठी काही दुरगामी स्वरुपाचे प्रयत्न जाणीवपुर्वक आणि सुनियोजीत दिशेने करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उभी करणे आवशक्य आहे.