अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल
मुंबई, दि. 28- फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्पा आणि तिच्या पतीने एकूण चार जणांची फसवणुक केली असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर ठाण्यातील कोनगाव पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.