नाशिक जिल्हा बँक बरखास्त करा- राजेंद्र डोखळे
निफाड, दि. 28- नाशिक जिल्ह्याची आर्थिक रक्तवाहिनी असलेली व शेतकर्यांना आर्थिक आधार देणारी संस्था म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँक हि महत्वाची बँक आहे. परंतु नियोजनशून्य कामकाज बँकिंग क्षेत्रात असलेले अज्ञान अव्यवहरिक कर्ज वाटप विना तारण कर्ज वाटप अनावश्यक खरेदी बेकायदा केलेली नोकर भरती त्यात झालेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार आदी कारणांमुळे नाशिक जिल्हा बँकैची आर्थिक शिस्त बिघडली असल्याने जिल्हा बँक बरखास्त करा अशी मागणी बँकेचे माजी संचालक राजेंद्र डोखळे यांनी नाबार्डचे मुख्य प्रबंधक यांचेकडे केली आहे.
नाबर्डला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, जिल्हा बँकेने मागील आर्थिक वर्षात ठराविक तालुक्यांना कर्ज वाटप केले त्यामुळे नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना कर्ज वाटपात झालेला अन्याय बेकायदा नोकरभरती बेसुमार खरेदी लॉकर दारोडा आदी कारणांनी बँकेवरचा शेतकर्यांचा व सर्वसामान्याना विश्वास उडाला आहे त्यातच नोटा बंदीच्या काळात बँकेत जमा झालेले 350 कोटी रुपयाचे संशयास्पद व्यवहार जमा झालेले रकमेचे रिझर्व् बँकेस न देता आलेले आर्थिक विवरण आदी कारणांनी बँक व्यवस्थापकांकडे सभासद ठेवीदार व कर्मचारी संशयाने पाहत आहे.
मागील वर्षी नियमित कर्ज फेडणार्या शेतकर्यांना कर्ज पुरवठा न केल्याने कर्ज वसुली थांबली आहे आदी कारणाने बँक आर्थिक अडचणीत आलेली आहे. अनेक संस्थांच्या कोट्यवधी रुपयांच्या मुदत ठेवी मुदत संपूनही परत मिळत नाही,शिक्षकांचे पगाराचे पैसे परस्पर वापरल्याने वाढलेला असंतोष जिल्हा परिषदेचे च्या अकाउंट मध्ये केले ला फेरफार यामुळे जिल्हा बँक बुडण्याची लक्षणे दिसू लागलेली आहे त्यातच एन.पी.ए.चे प्रमाण जवळपास 35 ते 40 % वर गेलेले आहे सी ,आर ,आर मध्ये मोठी तफावत झालेली आहे. एस एल आर चे प्रमाण आर बी आय च्या नियमानुसार न राखल्याने बँकेची आर्थिक शिस्त बिघडली आहे. यापुढे अजून आर्थिक अरीष्ट ओढवने पूर्वी जिल्हा मध्यवर्ती सह बँक बरखास्त करावी अशी मागणीनाबार्ड कडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. जिल्हा बँक बरखास्त करून प्रशासक नियुक्त करावा व बँकेची महाराष्ट्र सह कायदा 1960 कलम 61 अन्नव्ये 79 ,83,व88 कलमा द्वारे चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.