पाणपोईचे उद्घाटन
बुलडाणा, दि. 24 - येथील लॉयन्स क्लब आणि गृह सुविधा होम अलायन्संच्या संयुक्त विद्यमाने वाटसरुंची तहान भागविण्यासाठी सिव्हिल लाईन परिसरात पाणपोई सुरु करण्यात आली. या पाणपोईचे उद्घाटन डॉ. अशोक केला यांच्याहस्ते करण्यात आले. उन्हाळयाचे दिवस असल्याने वाटसरुंच्या घशाला कोरड पडत असून तहानेने त्यांच्या जिव कासाविस होत आहे. त्यामुळे वाटसरुंची तहान भागविण्यासाठी सदर पाणपोई सुरु करण्यात आली असून या पाणपोईच्या माध्यमातून नागरीकांना शुध्द आरओचे पाणी देण्यात येणार आहे.