मिरजगावला पायाभूत व मुलभूत सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध
अहमदनगर, दि. 04 - जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून मिरजगावमध्ये अत्यंत पथदर्शी काम झाले आहे, जलस्वयंपूर्ण गाव करण्यासोबतच मिरजगावाला पायाभूत व मुलभूत सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन, जलसंधारण व राजशिष्टाचारमंत्री तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे गोंदर्डी फाटा ते गोंदर्डी रस्त्याचे भूमिपुजन, जलयुक्त शिवार अभियानातील कामांची पाहणी या महत्वाच्या कामांसह विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यानंतर मिरजगावच्या पाणीपुरवठा व विकास आराखडयासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री प्रा.शिंदे बोलत होते, यावेळी कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, सरपंच नितिन खेत्माळस, उपसरपंच अमृतराव लिंगडे, ग्रामपंचायत सदस्य संपतराव बावरकर, माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ गोरे आदी उपस्थित होते.
प्रा. शिंदे म्हणाले की, मिरजगावच्या सर्वांगिण विकासासाठी निधी कमी पडु दिला जाणार नाही. मिरजगावात 3 कोटी 41 लाख रूपयांची विविध विकासकामे सुरू आहेत. मिरजगाव पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात असून याबाबत आपला शासन स्तरावर याबाबत पाठपुरावा सुरू आहे, लवकरच पाणीपुरवठा योजना मार्गी लावणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, कर्जत व जामखेड तालुक्यात रस्त्याचे मोठे जाळे निर्माण करणार असून या माध्यमातून विकासाला गती मिळणार आहे. कर्जत येथेही जलयुक्त शिवार अभियानातून पथदर्शी काम झाल्याने यावर्षी कर्जतला टँकरची गरज पडली नाही, हेच जलयुक्त शिवार अभियानाचे मोठे यश आहे. सर्वसामान्य माणुस विकासाचा केंद्रबिंदु मानून काम सुरू असल्याचे प्रा. श्री. शिंदे यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाण्याचे विकेंद्रित पाणीसाठे निर्माण केले आहेत. पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करून शेतीत ठिबकचा वापर वाढविणे गरजेचे आहे. पाणी व्यवस्थापनाचे नियोजन केले तर शेतीत निश्चित यश मिळते. असे सांगून शेडनेटमध्ये ढोबळया मिरचीचे भरघोस उत्पादन घेतलेल्या मिरजगाव येथील संजय पवार या शेतकर्याचे त्यांनी कौतुक केले. शेतकरी आधुनिक पदधतीने शेती करून चांगले उत्पन्न घेतात ही कौतुकास्पद बाब आहे. या शेतकर्यांची यशोगाथा इतर शेतकर्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरणार असल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले. यावेळी शेतकरी, ग्रामस्थ, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.