Breaking News

महाराष्ट्रात घरकुल हमी कायदा मंजुर करण्याची घरकुल वंचितांची मागणी

अहमदनगर, दि. 04 - मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकित नो घरकुल, नो मोदीची घोषणा देण्यात आली. घरकुल वंचितांना घरे मिळण्यासाठी मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात घरकुल हमी कायदा मंजुर करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी सोमवार दि.10 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या अडीच वर्षात राज्यातील भाजप सरकारने घरकुल वंचितांना घरे मिळण्यासाठी कोणताही कृती कार्यक्रम आंमलात आनला नाही. पंतप्रधान आवास योजना जाहिर केली मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसून, घरकुल वंचितांना पुढील निवडणुकांसाठी घरांचे दाखवलेले गाजर असल्याचे मत अंबिका नागुल यांंनी मांडले.
मध्यप्रदेश सरकारने घरकुल हमी कायदा मंजुर करण्यासाठी सध्याच्या अधीवेशनात अध्यादेश मांडला आहे. याद्वारे मनपाहद्दीतील 45 चौ.मी. चा बीगरशेती प्लॉट व इतर भागात 60 चौ.मी. चा प्लॉट घरकुल वंचितांना दिला जाणार आहे. या कायद्याने महाराष्ट्रात घरकुल वंचितांचे घरांचे स्वप्न साकार होणार असल्याने कायदा मंजुर करुन घेण्यासाठी आग्रही भुमिका घेण्याची उपस्थितांनी तयारी दर्शवली.
महाराष्ट्रात नापिक व पड जमीन मोठ्या प्रमाणात आहे. कायदा मंजुर करुन व लॅण्ड बँकेत पड जमीनी वर्ग केल्यास घरकुल वंचितांचा प्रश्‍न सुटणार असल्याचे अ‍ॅड.गवळी यांनी सांगितले. या बैठकिसाठी अ‍ॅड. गवळी, शाहीर कान्हू सुंबे, अ‍ॅड.संजय जव्हेरी, विठ्ठल सुरम, अंबिका नागुल, बाबा शेख, हिराबाई ग्यानप्पा, वैशाली नागपुरे, ओम कदम, मिना वंगा, अंबादास दरेकर, वर्षा लहाने, अर्चना अढाव आदिंसह शहर व उपनगरातील घरकुल वंचित मोठ्या संख्येने उपस्थित होते.