Breaking News

तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक शाळेचे आधुनिकिकरण काळाची गरज

अहमदनगर, दि. 04 - हे युग तंत्रज्ञानाचे आहे. यामध्ये जो नव-नवीन शिक्षण पद्धतीचे शिक्षण घेणार नाही तो शिक्षित असून सुद्धा अशिक्षित असल्यासारखे समाजावे लागते. म्हणून आजच्या नवीन पिढीला प्राथमिक शिक्षणाबरोबरच कॉम्प्युटरचे व तंत्रज्ञानाचे शिक्षण देणे गरजेचे झाले असून, त्यासाठी प्रत्येक शाळेचे आधुनिकरण ही काळाची गरज झाली आहे, असे प्रतिपादन कॅन्टोंमेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर विक्रांत नायर यांनी केले.
भिंगार येथील कॅन्टोमेंट बोर्डाच्या महात्मा गांधी उर्दू स्कूलच्या ए.पी.जे.अब्दुल कलाम संगणक कक्षाच्या उद्घाटन ब्रिगेडियर विक्रांत नायर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल कोळेकर, बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनित लोटे, उपाध्यक्ष सय्यद मुस्सदिक, स्कूल कमिटीचे चेअरमन सौ.मिना मेहतानी, उर्दू साहित्य परिषदेचे सचिव आबीद दुलेखान, आरोग्य समितीच्या सभापती शुभांगी साठे, अर्थ समितीचे चेअरमन कलिम शेख, सदस्य प्रकाश फुलारी, रविंद्र लालबोंद्रे, संजय छजलानी, सुनिल शिंदे, रमेश साके, योगेश बोरुडे, भाजपा भिंगार शहराध्यक्ष महेश नामदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख मोहंमद आसिफ, उपाध्यक्ष शेख कलिम, माजी शिक्षण विस्तार अधिकारी शेख अन्सार, नवेद मिर्झा, कार्यालय अधिक्षक शांतीकुमार शिरकुल आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ब्रिगेडियर नायर म्हणाले की, आज खासगी शाळांमध्ये मुलांना नवीन तंत्रज्ञानाबरोबरच सर्व सुविधा चांगल्या प्रमाणे देतात व त्यांच्या बरोबरच शासकीय शाळांनाही स्पर्धा करायची आहे, अशा वेळेस कॅन्टोंमेंटच्या शाळाही आधुनिक करण्याकडे वाटचाल करत आहे, असे नमूद करुन महात्मा गांधी उर्दू शाळेचे संपूर्ण लोकसहभागातून तयार केलेल्या संगणक कक्षाचे ब्रिगेडियर विक्रांत नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनित लोटे यांनी कौतुक करुन संगणक कक्षास मदत केलेल्या सर्व दानशूर व्यक्तींना बोर्डाकडून प्रशस्तपत्रक प्रदान करण्यात आले.
यावेळी विनित लोटे म्हणाले, बोर्डाने शैक्षणिक मुलभूत गरजांना प्राधान्य दिले आहे. कॅन्टोंमेंट शाळेचा भौतिक आणि गुणात्मक दर्जा वाढण्याकडे बोर्डाचे प्रयत्न आहेत. त्यामुळे अंतरबाह्य शाळांच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. गुणात्मक दृष्ट्याही शाळेची प्रगतीकडे वाटचाल चालू आहे. भिंगार शहरातील मुलांना शालेय शिक्षणाबरोबर माहिती तंत्रज्ञान, संगणक शिक्षण देण्याकरीता बोर्ड प्रयत्नशील आहेत. शाळेच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावे, या करीता बोर्डाने प्रत्येक वर्गाचे नुतनीकरण करुन अंतर्गत उत्कृष्ट प्रकारचे रंगीत माहितीचा खजिना उपलब्ध करुन दिला आहे, त्यामुळे वर्गाचे रुपच पालटले आहे, असे कॅन्टोंन्मेंट बोर्डे मुख्य कार्यकारी अधिकारी विनित लाटे यांनी सांगितले.कार्यक्रमास खान नसिम, शेख जोहरा, खान इब्राहिम, शेख रेश्मा, शेख शफात, गोविंद राऊत, मुख्याध्यापिका शामला गाठे, कारभारी आव्हाड, संजय शिंदे, पंकज मुनोत आदिंसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक खान खैरमोहंमद यांनी तर सूत्रसंचालन मुबीना शेख व आभार सुमय्या शेख व अरविंद कुडिया यांनी मानले.