Breaking News

झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

नवी दिल्ली, दि. 21 - वादग्रस्त मुस्लिम धर्म प्रचारक झाकीर नाईकविरोधात मुंबईतील राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. अलीकडेच पैशांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी झाकीरविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. चौकशीसाठी सहकार्य करत नसल्यामुळे सक्तवसुली संचनालयाने झाकीरविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याची मागणी केली होती. ढाक्यातील कॅफेवर हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांनी आपले प्रेरणास्थान झाकिर नाईक असल्याचे सांगितल्यानंतर झाकीर नाईक चर्चेत आला होता. नाईकच्या चिथावणीखोर भाषणांमुळे द्वेष निर्माण होत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.