चार दुर्मिळ भारतीय टपाल तिकीटांची चार कोटींमध्ये विक्री
नवी दिल्ली, दि. 21 - महात्मा गांधी यांचे छायाचित्र असलेल्या चार दुर्मिळ तिकीटांच्या चार कोटी रुपयांमध्ये विक्री करण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये एका लिलावात या तिकीटांची विक्री करण्यात आलीभारतीय टपाल तिकीटांना मिळालेली ही पहिलीच मोठी रक्कम असल्याचे लिलावकर्त्याने सांगतिले. ही तिकीटे चारच्या संचामध्ये असल्याने ती दुर्मिळ आहेत. यंदाच्या मार्चमध्ये 9,106,434.63 रुपयांमध्ये विक्री करण्यात आलेल्या चार आण्यांच्या तिकीटांचा लिलाव करण्यात आला होता. यानंतर आता टपाल तिकीटांचा लिलाव करण्यात आला. लिलाव करण्यात आलेली ही सारी तिकीटे दुर्मिळ संग्रहांपैकी एक असल्याचे सांगण्यात आले आहे.