महापौर महाडेश्वर यांचा लाल दिवा काढण्यास नकार?
मुंबई, दि. 21 - मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेंनी त्यांच्या वाहनावरील लाल दिवा काढण्यास नकार दिला आहे. राज्य सरकारने परिपत्रक काढल्यानंतरच दिवा काढेन, असे स्पष्टीकरण महाडेश्वर यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे .केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधानांसह सर्व केंद्रीय मंत्री , मुख्यमंत्री यांच्या वाहनावरचे लाल दिवे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची सर्वांनी अंमलबजावणी करावी. मात्र त्या आधी राज्य सरकारने परिपत्रक प्रसिद्ध करावे, असे महाडेश्वर यांनी म्हटले आहे. नोटा रद्दच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या सर्व खासदार व आमदारांना आपाल्या बँक व्यवहारांचे तपशील सादर करण्यास सांगितले होते. मात्र त्यापैकी किती जणांनी सूचनांचे पालन केले, असा प्रश्न महापौर महाडेश्वर यांनी विचारला.