Breaking News

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून जल-चळवळ उभारणार - आ. मेधा कुलकर्णी

पुणे, दि. 25 - कोथरूडच्याआमदार प्रा. सौ. मेधा कुलकर्णी यांच्या विकास निधीतून साकारलेल्या डहाणूकर कॉलनी मधील चंद्रलोकनगरी येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचे लोकार्पण आमदार प्रा. सौ. मेधा कुलकर्णी यांनी केले. मागील वर्षी जाहीर केल्याप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंग करता आमदार निधी उपलब्ध करून चंद्रलोकनगरी सोसायटी मध्ये हा प्रकल्प उभा केला गेला आहे. अश्या प्रकारे आज कोथरूड मतदार संघात एकूण 8 सोसायाटींमध्ये उभारला गेला आहे व पुढील 2 महिन्यात मतदार संघात अजून काही सोसायट्यांमध्ये पर्जन्य जल पुनर्भरण केले जाईल महाराष्ट्रात प्रथमच शहरी भागमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करता आमदार निधी उपलब्ध केला गेला आहे. आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांनी ह्याकरता शासन दरबारी भरपूर पाठपुरावा करून, प्रसंगी प्रशासनाशी वाद घालून खासगी जागेत सरकारी निधी अधिकृतरित्या उपलब्ध करून दिला आहे.
यावेळी बोलताना आमदार म्हणाल्या, पाण्याची समस्या ही दर वर्षी उन्हाळ्यात आपल्याला भेडसावते, आज आपण पाणी मुरवले तर आपल्या पुढच्या पिढ्यांच्या पाण्याची तरतूद आपल्याकडून होईल. नैसर्गिक पाणी स्त्रोत ह्या पद्धतीने जपले पाहिजेत. चंद्रलोकनगरीने पाणी जमिनीत साठवले तर आजूबाजूच्या सोसायट्यांनाही त्याचा फायदा होईल. ही जल चळवळ मोठ्या प्रमाणावर मला निर्माण करायची आहे. त्यात तुम्ही सहभागी झालात, आता तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या सोसायट्यांना ह्यात सहभागी करून घ्या. हे केल्यामुळे आपल्या जमिनीतील पाण्याची फक्त पातळीच वाढेल असे नाही तर ते पाणी भविष्यात पिण्यायोग्याही होईल. तेंव्हा व्यापक समाज हीत डोळ्यापुढे ठेऊन आपण सर्व मिळून पुणे शहराचा पाणी प्रश्‍न सोडवूया.
यावेळी चंद्रलोकनगरी सोसायटीचे अध्यक्ष श्री नातू व सचिव श्री. पाठक, श्री. मिहीर प्रभुदेसाई, भाजपाचे प्रभाग अध्यक्ष श्री. सचिन फोलाने, हा प्रकल्प उभा करणारे आर्किटेक्ट मंदार घाटे व आर्किटेक्ट अरविंद दांडेकर उपस्थित होते.