Breaking News

महाराष्ट्र दिनी शिवाजी पार्क उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

मुंबई, दि. 25 - महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने दिनांक 1 मे 2017 रोजी शिवाजी पार्क, दादर येथे होणार्‍या संचलन समारंभात दहशतवादी अथवा असामाजिक तत्वांकडून कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी शिवाजी पार्क हवाई क्षेत्र उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
यानुसार या हवाई क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडविण्यात येणारी अतिलघु (मायक्रोलाईट) विमाने उडविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 नुसार बृहन्मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकान्वये देण्यात आले आहेत.