भुजबळांनी स्वतःला भ्रष्टाचाराच्या दलदलीत का झोकून दिले...?
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंञी ,माजी गृह आणि सार्वजनिक बांधकाम मंञी छगन भुजबळ 21 व्या शतकातील पोलादी राजकीय पुरूष....या पोलादी व्यक्तीमत्वावर भ्रष्टाचाराचा गंज चढला म्हणून आर्थरच्या बंद कोठडीत मुक्काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली.प्रश्न असा पडतो की,खरोखर भुजबळ यांनी हेतूपुरस्सर भ्रष्टाचार केला असेल का? राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या सृजन सर्जनशील आणि तितकेच जागरूक असणारे छगन भुजबळ भ्रष्टाचाराच्या दलदलीत स्वतःहून झोकून देतील? मग कसे फसले भुजबळ..?भुजबळांना फसविण्यात कुणाकुणाचे योगदान आहे?दि. 04, एप्रिल - सार्वजनिक बांधकाम मंञी म्हणून कार्यभार सांभाळत असतांना महाराष्ट्र सदन ,कलीना भुखंड, ग्रीन बिल्डींग,सप्तशृंग गडावरील फनीक्यूलर ट्राली,यासोबत नियमित देखभाल दुरूस्ती अडजस्टमेंट हेडखाली सावळा गोंधळ झाल्याचा आरोप गेल्या तीन वर्षापासून सातत्याने होतो आहे.या आरोपांमध्ये अजिबात तथ्य नव्हते किंवा नाही असे म्हणण्याचे धाडस आम्ही करणार नाही.अर्थात सार्वजनिक बांधकाम खात्यात काम करणार्या अभियंत्यांना,सचिव पातळीवरील उच्च पदस्थांना,किंवा या खात्याच्या मंञ्यांना अशा प्रकारचे आरोप नविन नाहीत.किंबहूना सार्वजनिक बांधकाम खात्याकडे कमाईचे हिरवे कुरण म्हणूनच पाहिले गेले.भुजबळ यांच्या काळात विशेष काही वेगळे अफलातून घडले असे काही नाही.गेल्या सत्तावन वर्षात गत पंधरा वर्षातच हे खाते भ्रष्ट झाले असे अजिबात नाही.भुजबळ यांच्या पुर्वीही अशी अनेक प्रकरणे घडली अन् विरली देखील.मग भुजबळ यांच्या काळातच वेगळं असं काय घडलं?
भुजबळ यांना क्लीन चीट देण्यासाठी ही धडपड मुळीच नाही.या भ्रष्टाचाराला भुजबळ जबाबदार असतील तर त्यांना सजा व्हावी म्हणून लोकमंथन अग्रेसर राहील,नव्हे यापुर्वी देखील भुजबळांवर शब्दांचे आसूड ओढण्यास लोकमंथनने कधीच कंजूषी केली नाही.मुद्दा तपास यंञणेच्या मुळ हेतूवर संशय घेण्याचा नाही तर या एकूणच प्रकरणाची दिशा ठरवितांना छुपा अजेंडा काम करीत असावा अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे.भुजबळ दोषी नाहीतच असे आमचे मत आहे असा अर्थ कुणी काढू नये.ते दोषी असतीलही पण एव्हढा मोठा भ्रष्टाचाराचा महाप्रपंच एकट्या भुजबळांनी मांडला का?सार्वजनिक बांधकाम खात्यातील मुख्य,अधिक्षक,कार्यकारी,उप,शाखा अशा विविध स्तरावर काम करणारा अभियंता या प्रकरणांत कुठेच सहभागी नाही का? मग या पापाला एकट्या भुजबळांच्या झोळीत का टाकले गेले? काय हेतू आहे? कोण आहे या षडयंञामागे? राजकीय प्रतिस्पर्धी , दुखावलेली तपास यंञणा,की भुजबळांना गराडा घातलेल्या गोतावळ्याचा स्वार्थ?
मुंबई शहर इलाखा-उत्तर मुंबईतही तेवीस टक्क्यांचा व्हायरस
शहर इलाखा आणि उत्तर मुंबई साबां मंडळालाही तेवीस टक्के लाच स्वीकारण्याचा व्हायारसने ग्रासल्याची चर्चा आहे .कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके आणि श्रीमती परदेशी यांनी स्वतःसाठी वीस तर प्रकल्प निधी मंजूरीसाठी तीन टक्के दर ठरविल्याची चार्चा आहे.या हिशेबाप्रमाणे शहर इलाखा विभागात तीस कोटी पैकी जवळपास सात कोटी तर उत्तर मुंबईत जवळपास साडे अकरा कोटीचा लाच व्यवहार झाल्याची वाच्यता आहे. या संदर्भात तपशिलवार दखल उद्यापासून...