Breaking News

आयपीएल : मुस्तफिझूर 7 एप्रिलला हैदराबाद संघात सामील होणार

हैदराबाद, दि. 03 - बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान हा 7 एप्रिलपासून आयपीएलमधील सामन्यांसाठी हैदराबाद संघात सामील होणार आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाकडून मिळालेले संकेत निराळे असले, तरीही मुस्तफिझूर 7 एप्रिलला संघात सामील होईल, अशी आम्हाला आशा आहे, अशी माहिती संघाचे प्रशिक्षक टॉम मूडी यांनी दिली. 5 एप्रिलला होणा-या बंगळुरूविरूद्धच्या सामन्याला त्याला मुकावे लागणार आहे, मात्र 7 तारखेला तो हैदराबाद संघात सामील होणार असून तो स्पर्धेतील थोडेच सामने खेळणार असल्याची शक्यता आहे.