Breaking News

हरिभाऊ राऊत यांना शासनाचा उत्कृष्ट गणेश मुर्तीकार पुरस्कार

बुलडाणा, दि. 24 - 21 एप्रिल 2017 रोजी टाटा थिएटर, एनसीपी, नरीमन पाँईंट मुंब ई, येथे महाराष्ट शासनाच्या वतीने जेष्ठ मुर्तीकार हरीभाऊ राजाराम राऊत कुंभार  देऊळगांव माली, ता.मेहकर जि.बुलढाणा यांना महाराष्ट शासनाचा प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट गणेश मुर्तीकार  पुरस्कार देऊन त्याच्या वयाच्या 68 व्या वर्षी त्याच्या माती कलेचा गौरव शासनाच्या वतिने करण्यात आला. यावेळी प्रशस्तीपञ, सन्मानचिन्ह, देऊन राऊत परीवाराचा देऊन सन्मान करण्यात आला. 
सत्कार करतानां महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस, ना.सुधीर मुनगंटिवार, वित्त व नियोजन वन मंत्री महा.राज्य, विनोद तावडे  शिक्षण व सांस्कृतिक कायँ मंत्री, अनिल देसाई मा.पालकमंत्री मुंबई शहर, महापौर मुंबई, खासदार अरविंदजी सांवत, विधानसभा सदस्य देशमुख, वाल्सा नायर सिंह (भा.प्र.से) प्रधानसचिव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन, विधान परीषद संदस्य तसेच संजय पाटील संचालक सांस्कृतिक विभाग महा.शासन इत्यादी मान्यवराच्या  हस्ते पुरस्कार देऊन हरीभाऊ राऊत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सौ.शांताबाई राऊत, रामेश्‍वर राऊत व कैलास राऊत यांची उपस्थिती होती.