Breaking News

रुपेश झाला डॉ.आंबेडकर राष्ट्रीय मेधा पुरस्काराचा मानकरी

बुलडाणा, दि. 24 - स्थानीय मलकापूर परिसरातील रहिवाशी व आरएलटी विज्ञान महाविद्यालयातील बारावीचा गुणवत्ता यादीतील विध्यार्थी रुपेश अनिल वानखडे यांला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने दिल्या जाणारा डॉ. आंबेडकर राष्ट्रीय मेधा पुरस्कार मिळाला असून पुरस्कारासह त्याला साठ हजार रुपयांचा धनादेश बहाल करण्यात आला आहे. रुपेश हा मुंबई येथील सेठ जीएस केईएम वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस करीत आहे. 
 केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या डॉ आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने बहुजन मागास समाजातील इयत्ता बारावीतील गुणवत्ताप्राप्त विध्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर राष्ट्रीय मेधा पुरस्कार दरवर्षी दिल्या जातो.रुपेश हा गत वर्षी आरएलटी विज्ञान महाविद्यालयातुन बारावीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम मेरिट आला होता. त्याची दखल घेऊन त्याला हा मनाचा मेधा पुरस्कार बहाल करण्यात आला.हा पुरस्कार मिळविणारा रुपेश हा विभागातुन प्रथम लाभार्थी मानल्या जात आहे.
दिल्ली येथील स्टेन ऑडिटोरियम मध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात रुपेशला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. श्रीकृष्ण पाल गुर्जर,ना.विजय सापला,ना.रामदास आठवले आदींच्या उपस्थितीत राष्ट्रीय मेधा पुरस्कार व साठ हजार रुपयांचा धनादेश बहाल करून त्याचा गौरव करण्यात आला.
रुपेशचे वडील जिल्हा न्यायालयात कार्यरत असून तो आपल्या या यशाचे श्रेय आपले वडील,आई रत्नमाला,आजोबा उत्तमराव वानखडे,प्राचार्य डॉ.विजय नानोटी याना देतो.  त्याच्या या उपलब्धी बद्दल त्याचे अड.प्रवीण तायडे,अड.चंद्रकांत वानखडे,डॉ. धर्मेंद्र राऊत,राजेंद्र पातोडे, सम्यक संबोधी संस्थेचे अध्यक्ष सुगत वाघमारे आदींनी कौतुक केले.