Breaking News

विदर्भ मार्केटींग फेडरेशनच्या वतीने शासकीय माल वाहतूकीच्या नियमांची पायमल्ली

बुलडाणा, दि. 24 - शेतकर्‍यांच्या तुरीला किमान भाव मिहावा यासाठी शासनाने नाफेडद्वारा शासकीय खरेदी सुरू केली आहे. मात्र मलकापूर येथील शासकीय गोदामाची साठवण क्षमता संपल्याने चिखली, बुलडाणा, भुसावळ व अन्य ठिकाणी खरेदी केलेली तुर पाठवितांना विदर्भ को-ऑप. मार्केटींग फेडरेशन मालवाहतुकीच्या नियमांची पुर्णपणे पायमल्ली केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मलकापूर येथे पणन संघाच्या वतीने स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी विक्री संघाद्वारे तूर खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू असून स्थानिक शासकीय गोदामातील साठवण क्षमता संपल्याने खरेदी केलेली तुर जिल्ह्याच्या व जिल्हा बाहेरील गोदामात पाठविण्यात येत आहे. परंतू पाठविण्यात येत आहे. परंतू पाठविण्यात येणार्‍या तुरीची वाहतूक करण्यासाठी शासनाच्या अधिकार्‍यांनी कोणतीही निविदा प्रकाशीत केलेली नाही व खाजगी ट्रक धारकास तुरीची वाहतूक करण्याचा ठेका देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे ठेका देण्यात आलेल्या ट्रक धारकावर व त्याच्या वाहनावर शासकीय धान्य अवैध रितीने खुल्या बाजारात विक्री करण्याच्या आरोपाखाली शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. तसेच वाहतूक करण्यात येणार्‍या तुरीची जबाबदारीची लेखी हमी ट्रक धारक व चालक वाहकाकडून घेतलेली नाही. तसेच मालवाहतूक करण्यात येणार्‍या तुरीचा विमा काढण्यात येत नाही. तर शासनाच्या नियमाप्रमाणे 6 चाकी वाहनातुन 9 टन, तर 10 चाकी वाहनातुन 16 टनाची वाहतुक करण्याचा परवाना असतांना ट्रकधारक तुरीची वाहतूक करतांना 6 चाकी वाहनातुन 17 टन तर 10 चाकी वाहनात 28 टनाची वाहतूक करीत आहे.
शासकीय नियमांची पायमल्ली होत असल्याने याप्रकरणी शासनाच्या वरिष्ठ अधिकारी व पदाधिकार्‍यांनी गंभीररितीने चौकशी करुन स्थानिक तुर खरेदी करणार्‍या व निविदा प्रकाशित न करता वाहतूकीचा ठेका देणार्‍या अधिकार्‍यांवर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांमध्ये होत आहे.