एकल शिक्षकांवरील न्यायकारक बदल्या थांबवा - एल.पी.नरसाळे
अहमदनगर, दि. 21 - प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये एकल शिक्षकांवर होणारा अन्याय दूर न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा प्राथमिक शिक्षक मंचाचे राज्य प्रवर्तक एल. पी. नरसाळे यांनी दिला. ऐक्य मंदिराच्या सभागृहात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षक बँकेचे नगर तालुका संचालक संतोष दुसुंगे होते. सध्या शिक्षकांच्या बदल्या संदर्भात चर्चा सुरू आहे. बदल्यांमध्ये एकल शिक्षकांवर अनेक वर्षांपासून अन्याय होत आला आहे.
प्रथम हा विषय चेष्टेचा वाटत होता. मात्र आता याबाबत गांभिर्याने घ्यावी लागणार आहे. वेगवेगळ्या संवर्गातील शिक्षकांना सवलती मिळतात, बदलीत सूट मिळते. एकल शिक्षकालाच अडचणीच्या जागेवर बदली केल्या जाते. एकल शिक्षकाला कुटूंब, आई, वडील नसतात का. याचा विचार प्रशासनाने करायला हवा. याप्रश्नी आमच्या गुरी माऊली संघटनेचा पाठींबा असल्याचे जिल्हाद्याक्ष बापूसाहेब तांबे यांनी सांगितले. या मेळाव्यात प्रविण शेरकर, शरद कोतकर, संभाजी नरवडे, संजय ओहोळ, यांनी आपली मते मांडली. प्रारंभी प्रास्ताविक अरूण कडूस यांनी केले. सऊथ संचालन राजेंद्र पायमोडे तर अभार मोहन लांडगे यांनी मानले.