विश्रांतवाडीत गादीच्या कारखान्याला आग, एकाचा मृत्यू
पुणे, दि. 04 - विश्रांतवाडीतील शांतीनगर कॉर्नरला असलेल्या गादीच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना (दि. 3) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
मोहम्मद अकबर (वय 36, रा. बिहार) असे होरपळून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्रांतीवाडीतील शांतीनगर कॉर्नर येथे हुस्न गादी सेंटर नावाचे दुकान आहे. आज सकाळी हे दुकान उघडून मोहंम्मद अकबर काम करत होता. त्यावेळी अचानक दुकानाला आग लागली. त्यामुळे अकबरला बाहेर येण्यासाठी मार्ग मिळाला नाही आणि त्यातच त्याचा होरपळून मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या आणि एका खाजगी पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कारखान्याच्या बाजूला असलेल्या एका टपरीवजा दुकानाचे देखील नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली असावी, असा अंदाज अग्निशामक दलाच्या अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.