Breaking News

शेतकर्‍यांनंतर शहीदांच्या कुटुंबीयांसाठी ‘नाम’चा पुढाकार

पुणे, दि. 04 - आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोट्यवधींची रक्कम उभी करणार्‍या अभिनेते मकरंद अनासपुरे आणि अभिनेते नाना पाटेकर यांची ‘नाम फाऊंडेशन’ आता शहीज जवानांच्या कुटुंबांना मदत करणार आहे. येत्या 10 एप्रिलला राज्यातील 20 शहीद जवानांच्या कुटुंबांना प्रत्येकी अडीच लाख रुपये मदत केली जाणार आहे. विशेष म्हणजे अभिनेते नाना पाटेकर हे स्वत: ही रक्कम देणार आहेत. ‘नाम’चे संस्थापक अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी पुण्यात यासंदर्भात माहिती दिली.
शेतकरी आणि जवानांसाठी काम करणं हाच ‘नाम’च्या स्थापनेचा उद्देश आहे. शेतकर्‍यांसाठी थोडं काम झाल्यावर आता जवानांसाठीच्या कामाकडे वळत आहोत, हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रापुरता नाही, देशभरात हा कार्यक्रम होईल., असं अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी स्पष्ट केलं.