Breaking News

श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयास इंग्लिश ऑलिम्पियाडमध्ये एक्सलन्स अ‍ॅवार्ड

संगमनेर (प्रतिनिधी), दि. 25 - सिल्वर झोन फाउंडेशन, दिल्ली आयोजित इंटरनॅशनल ऑलिम्पियाड ऑफ इंग्लिश लँग्वेज परीक्षेत श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयास एक्सलन्स अ‍ॅवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. सन 2016-2017 मध्ये आयोजित या परीक्षेत इ.11 वी व इ.12 वी चे एकुण 258 विद्यार्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या परीक्षेचा निकाल अनुक्रमे इ.11 वी सुवर्णपदक - कु. ऋषिकेश दुसाने, रजतपदक-कु.भाग्यश्री कडलग, कास्यपदक-कु . विद्या खाडे, इ.12 वी सुवर्णपदक-कु.ओवी तासिलदार यांनी सुयश प्राप्त केले.
श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची कौशल्ये विकसित होण्याच्या दृष्टीने दरवर्षी महाविद्यालयात इंग्लिश ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात येते.
इंग्लिश ऑलिम्पियाडच्या समन्वयक प्रा.सुरेखा भवर यांनी यशस्वीरित्या या परीक्षेचे नियोजन केले. त्यांना प्रा.संदिप सहाणे, प्रा. शिशुपाल वाघमारे, प्रा. ज्ञानेश्‍वर जेजुरकर या समिती सदस्यांनी सहकार्य केले.
संस्थेचे अध्यक्ष बिहारीलाल डंग, कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, सचिव डॉ.अनिल राठी, खजिनदार प्रकाश बर्डे व संस्थेचे कार्यकारीणी सदस्य अनिल सातपुते तसेच प्राचार्य डॉ.के.के.देशमुख, उपप्राचार्य अजित शेलार, पर्यवेक्षक नवनाथ मते तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे भरभरुन कौतुक केले.