Breaking News

सुगाव प्राथमिक शाळेस झेरॉक्स मशीन भेट

अकोले, दि. 25 - शाळेची गुणवत्ता वाढावी, शाळेत अद्यावत यंत्रणेच्या सहाय्याने शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी नवीन साधणाची आवश्यकता असते. या गोष्टीची गरज ओळखून अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थी अंबादास प्रभाकर वैद्य यांनी कै. रंगनाथ देवबा वैद्य यांच्या स्मृती प्रित्यर्थ शाळेत झेरॉक्स मशिन भेट दिले.
याचप्रमाणे गंगाधर रामचंद्र वैद्य यांनी नुकतीच शाळेला प्रोजेक्टर भेट दिला आहे. तसेच संपत गोविंद वैद्य यांनी शाळेस प्रिंटर, स्कॅनर देवून शाळेत सुविधा असावी म्हणून दिले. याप्रसंगी शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुश वैद्य, गावचे  सरपंच महेश वैद्य, लक्ष्मण वैद्य, अमोल वैद्य आदी उपस्थित होते. शिक्षक ज्ञानदेव फड यांनी सर्वांचे अभिनंदन केले. लक्ष्मण वैद्य यांनी देणगीदारांचे आभार मानले. अंबादास वैद्य यांचा मुख्याध्यापक सखाराम मेसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शिक्षीका वंदना काळे यांनी केले तर आभार सौदामिनी सोनवणे यांनी मानले.