नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यास काँग्रेसचे नुकसान- आ. थोरात
संगमनेर (प्रतिनिधी), दि. 25 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायन राणे यांनी पक्ष सोडल्यास काँग्रेसचे मोठे नुकसान होईल असे मत माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
कॉग्रेसचे नेते नारायण राणे हे पक्षातील वरीष्ठ नेत्यांवर नाराज असल्याने ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलतांना आमदार थोरात म्हणाले की, नारायण राणे हे कांग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाचे ते मोठे भांडवल आहे. ते जर काँग्रेस पक्ष सोडून दुसर्या पक्षात गेले तर काँग्रेस पक्षाला चांगल्या नेतृत्वाला मुकावे लागेल. वरीष्ठ नेत्यांनी राणे यांची नाराजी दुर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
पेट्रोलच्या दरात तीन रुपयांनी वाढ झाली. त्याबद्दल बोलतांना आमदार थोरात म्हणाले, सद्याच्या सरकारने पेट्रोलवर लावलेला कर हा झिजिया कर आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात 72 हाजर कोटी रुपयाची शेतकर्यांना कर्जमाफी झाली होती. मात्र कर्जमाफी करतांना कोणत्याही प्रकारचा कर लावला नव्हता. मात्र सद्याच्या सरकाने पेट्रोलचे दर वाढवून सामान्य माणसाचे शोषण सुरु केले आहे. पेट्रोलवर झिजिया कर लावून शेतकर्यांची कर्ज माफी करण्याऐवजी पैसे उपलब्ध करण्यासाछठी अनेक मार्ग आहेत. त्या मार्गांने पैसे उपलब्ध करावा असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.