‘फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर’ आर्थिक घोटाळा प्रकरणी मुख्यसूत्रधाराला अटक
नाशिक, दि. 21 - फडणीस ग्रुप ऑफ कंपनीज आणि फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर माध्यमातून पैसे दुप्पट करणार असे भासवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या विनय प्रभाकर फडणीस याला पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात सुधीर नागेश हिंगे (65) खोडेनगर यांनी फिर्याद दिली असून त्यांची एकूण 10 कोटी 43 लाख 72 हजार रुपयांची फडणीस ग्रुपने फसवणूक केली असून गुन्हा नोंदवला आहे.
फडणीस ग्रुपचे महाराष्ट्रातच 8 हजार गुंतवणूकदार असून नाशिकमध्येच 2000 गुंतवणूकदार आहेत. एकूण तब्बल 300कोटींहून अधिक रुपयांचा हा घोटाळा उघड झाला आहे. झटपट श्रीमंतीसाठी अनेकांनी लाखो कोट्यावधी रुपये गुंतवले होते. तर या प्रकरणात जवळपास 200 तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत.
या प्रकरणात 30सष्टेंबर 2016 रोजी फडणीस ग्रुप ऑफ कंपनीज आणि फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरविरोधात अनेक गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी फिर्याद दिली होती. त्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. मुख्य संशयित ताब्यात आल्याने पोलिसांना तपास योग्य पद्धतीने आणि वेगात करता येणार आहे.