विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणी मुख्याध्यापकाच्या तोंडाला फासले काळे
नागपूर, दि. 21 - येथील शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या तोंडाला काळे फासले. यासंदर्भातील एक ध्वनीचित्र प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी या मुख्याध्यापकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. मुख्याध्यापकाने शाळेचे ओळखपत्र परत करण्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केली असल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. मुख्याध्यापकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिक्षेदरम्यान कॉपी केल्यामुळे या विद्यार्थीनीचे ओळखपत्र जप्त करण्यात आले होते. त्यावेळी ओळखपत्र परत देतो मात्र मला शरीरसुख दे अशी मागणी या मुख्याध्यापकाकडून करण्यात आली असल्याचे या विद्यार्थीनीने सांगितले.