बिहार परीक्षा घोटाळा : बच्चा राय यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली, दि. 21 - बिहार परीक्षा घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार बच्चा राय यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याबरोबरच पाटणा उच्च न्यायालयाने दिलेला आदेशही सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य पाहता राय यांची कारागृहातून सुटका करणे शक्य नसल्याचे मत न्यायालयाने नोंदवले. या घोटाळ्याप्रकरणी बच्चा राय यांना पाटणा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र बिहार सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवरील सुनावणीदरम्यान पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देत बच्चा राय यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली होती. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना त्याची कारणे विषद केली नव्हती. तसेच या घोटाळ्यातील राय हा मुख्य आरोपी असल्यामुळे त्यांना जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी बिहार सरकारने आपल्या याचिकेत केली होती. आज सर्वोच्च न्यायालयाने राय यांचा जामीन रद्द केला आहे.