Breaking News

पंतप्रधान मोदी यांच्याकडे दहशतावादाविरोधात ठोस उपाययोजना नाहीत : मणिशंकर अय्यर

नवी दिल्ली, दि. 03 -  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ दहशतवादाविरोधात भाषणे करतात, मात्र दहशतवादाविरोधात ठोस उपाययोजना मोदी सरकारकडे अद्यापही नाहीत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केली. काल काश्मिरमधील बोगद्याच्या लोकापर्णानंतर केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी काश्मिरमधील दहशतवादी कारवायांबाबत भाष्य केले होते. त्या बाबत अय्यर बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त दहशतवादावर भाषणे देतात. पण दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी देशाने काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक असते. अशा कोणत्याही उपाययोजना मोदी सरकाकडे असल्याचे दिसत नाही. मोदी जेव्हा लोकांपुढे येतात आणि जाहीर सभा घेतात, तेव्हा ते कायम एखादा नवा विषय (जुमला)  लोकांपुढे मांडतात, पण त्या नव्या विषयाबाबत ठोस अशा उपाययोजनांबद्दल ते काहीच बोलत नाहीत, असे अय्यर म्हणाले.
काश्मिरमधील खो-यांमध्ये होणारा दहशतवाद आणि इतर कारवाया जेव्हा बंद झाल्या, त्यावेळी मोदी सरकारने त्या गोष्टीचा फायदा करून परिस्थिती नियंत्रणात आणायला हवी होती, मात्र त्यांनी तेसे केले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.