पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
नवी दिल्ली, दि. 03 - जम्मू-काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. या गोळीबारास भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पाकिस्तान लष्कराने सकाळी 9.30 वाजता भारताच्या लष्करी तळावर हल्ला केला. ही चकमक अद्यापही सुरु असून यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
