Breaking News

श्रीलंकेच्या टी20 संघातून कुशल मेंडीसला वगळले

कोलंबो, दि. 03 -  बांगलादेशविरूद्धच्या आगामी टी20 मालिकेसाठी फलंदाज कुशल मेंडीस याला श्रीलंकेच्या संघातून वगळण्यात आले आहे. कुशल मेंडीस एकदिवसीय मालिकेसाठी मालिकावीर ठरला होता. मात्र, त्याच्यावर जास्त ताण पडू नये, म्हणून त्याला विश्रांती देण्यात आली असल्याचे निवड समितीकडून सांगण्यात आले आहे. फिरकीपटू सचिथ पाथीराना यालाही संघातून वगळण्यात आले आहे. ही दोन सामन्यांची टी20 मालिका 4 एप्रिलपासून सुरू होणार आहे.