Breaking News

जनतेने टाकलेल्या विश्‍वासाची उतराई, विकासात्मक कामाने केली जाणार - लामखडे

अहमदनगर, दि. 14 - निंबळक गटातील विकासात्मक कामे मार्गी लावण्यासाठी नियोजनात्मक आराखडा तयार करण्यात आला आहे. जनतेने टाकलेल्या विश्‍वासाची उतराई, विकासात्मक कामाने केली जाणार असून, पहिल्याच वर्षी मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे मार्गी लावले जाणार आहे. गावोगावी ग्रामसभा घेवून त्यांचे प्रश्‍न जानून घेतले जाणार आहे. गावाच्या विकासासाठी राजकाराण बाजूला ठेवून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जि.प. सदस्य माधवराव लामखडे यांनी केले. 
नगर तालुक्यातील निंबळक ग्रामस्थांच्या वतीने जि.प. सदस्य माधवराव लामखडे यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहिर नागरी सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब लामखडे तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इसळकचे सरपंच पोपटराव खामकर, भाऊसाहेब गेरंगे, दत्तापाटील सप्रे, उद्योजक बाळासाहेब साठे, आदम पटेल, केतन लामखडे, दादा साठे, मा.सरपंच विलास लामखडे, राजू रोकडे, बाबासाहेब पगारे, अशोक पवार, उपसरपंच घनश्याम म्हस्के, शरद लामखडे, विळदचे सरपंच संजय बाचकर, प्रशांत गोडसे, कानिफनाथ कोतकर, जयराम जाधव, विलास होळकर, समीर पटेल, बी.एम. कोतकर, प्रा.सुनिल जाजगे, मारुती कोतकर, बाळासाहेब कोतकर आदिंसह ग्रामपंचायत  सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.   कार्यक्रमाच्या प्रारंभी माधवराव लामखडे यांचे फटाक्यांच्या आतषबाजीने गावात जंगी स्वागत करण्यात आले. ढोल, ताशाच्या गजरात गावातून मिरवणुक काढण्यात आली होती.