जयहिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचा सामाजिक सेवेबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
अहमदनगर, दि. 14 - माजी सैनिकांनी सामाजिक भावनेतून स्थापन केलेल्या जयहिंद सैनिक सेवा फाऊंडेशनला हरिहरेश्वर प्रतिष्ठाणच्या वतीने सामाजिक सेवेबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. केडगाव येथे झालेल्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात महापौर सुरेखाताई कदम यांच्या हस्ते फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे तसेच संघटनेचे सदस्य भाऊसाहेब कर्पे, निवृत्ती भाबड, जगन्नाथ जावळे, संभाजी वांढेकर, दिगंबर शेळके यांनी पुरस्कार स्विकारला. यावेळी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, संयोजक डॉ.श्रीकांत चेमटे, कडूभाऊ काळे, वासुदेव महाराज शास्त्री, गणेश शिंदे आदि प्रमुख पाहुणे व्यासपिठावर उपस्थित होते.
माजी सैनिकांनी जयहिंद सैनिक सेवा फाऊंडेशनची स्थापना करुन, आपल्या पेन्शनच्या पैश्यातून वर्गणी करुन शहरात सामाजिक कार्य चालू केले आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांसाठी आरोग्य शिबीर, वृक्षरोपण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व स्वच्छता अभियान आदि उपक्रम राबविले जात आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत फाऊंडेशनला पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे डॉ.चेमटे यांनी स्पष्ट केले. महापौर सुरेखा कदम म्हणाल्या की, सामाजिक कार्याची दखल घेतल्यास काम करणार्यांना प्रोत्साहन मिळते. सामाजिक कार्यकर्ते पुरस्काराच्या अपेक्षेने काम करत नसतात, मात्र त्यांच्या कार्याचा गौरव झाल्यास त्यांच्या कार्याची प्रेरणा इतरांना मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.